Site icon Marathi News

RTE Admission Process 2024-25 Maharashtra State : how to Apply? आरटीई ऑनलाईन प्रवेश

2024-25 च्या वर्षासाठी RTE 25% प्रवेश प्रक्रियेच्या अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांची व्हेरिफिकेशन सोमवार, 17/05/2024 पासून सुरू झाली आहे.

या अगोदर सन २०२४-२५ या वर्षा करीता आरटीई च्या २५ % जागांसाठी पालकांकडून ऑनलाईन फॉर्म मागविले होते. परंतु उच्च न्यायालयाकडून ऑनलाईन फॉर्म भारण्यावरती स्थगिती आणली होती. या निर्णयामध्ये सुधार करून परत उच्च न्यायालयाने नव्याने ऑनलाईन फॉर्म भरण्याची मंजुरी दिली आहे. तरी सदर ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख ही १७/०५/२०२४ पासून सुरु करण्यात आली आहे. याची पालकांनी नोंद घ्यावी.

1) यापूर्वी सन २०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आलेली आहे.

2) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

3) यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी.

पालकांकरीता सूचना (2024-2025)

1)  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3)  आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा.

4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

5) अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र   पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8)  अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

11) RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31/05/2024 पर्यंत राहील.

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

13) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

14) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

Table of Contents

Here’s a table of contents based on the provided information:

  1. District-wise School Registration and Online Application Dates (2024)
DistrictSchool Registration FromSchool Registration ToOnline Application OpenOnline Application Close
Ahmadnagar04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Akola04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Amravati04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Aurangabad04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Bhandara04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Bid04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Buldana04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Chandrapur04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Dhule04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Gadchiroli04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Gondiya04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Hingoli04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Jalgaon04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Jalna04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Kolhapur04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Latur04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Mumbai04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Nagpur04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Nanded04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Nandurbar04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Nashik04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Osmanabad04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Palghar04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Parbhani04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Pune04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Raigarh04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Ratnagiri04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Sangli04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Satara04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Sindhudurg04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Solapur04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Thane04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Wardha04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Washim04/03/202420/05/202417/05/202431/05/2024
Yavatmal04/03/202420/05/202417/05/202431/05/2024

अधिक माहिती साठी पुढील link क्लिक करा.

Exit mobile version